Bank Strike: बॅंक कर्मचाऱ्यांचा 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप, बॅंकेच्या व्यवहारांवर होणार मोठा परिणाम
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) तर्फे सगळे बॅंक कर्मचाऱ्यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.  देशभरातील बँकिंग सेवांवर (Bank Services) या संपाचा परिणाम होणार आहे. तर तुमचे बॅंके संबंधित काही महत्वाच्या कामांचं नियोजन केलं असल्यास ते तुम्हाला पुढे ठकलावं लागणार आहे. युनियनमधील काही गोष्टी मान्य नसल्याने या निषेधार्थ बॅंक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees) संप पुकारला आहे. सोनाली बँक (Sonali Bank), एमयूएफजी बँक (MUFG Bank), फेडरल बँक (Fedral Bank) आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक (Standard Chartered Bank) यांनी एआयबीईए युनियनच्या नेत्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.तर बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) सारख्या सरकारी बँका ट्रेड युनियन (Bank Trend Union) अधिकार नाकारत आहेत तर कॅनरा बँक(Canara Bank) , बँक ऑफ इंडिया (Bank Of India), बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) अनेक बँकिंग क्रियाकलाप आउटसोर्स करत आहेत. या निषेधार्थ संपूर्ण बॅंक कर्मचाऱ्यंनी देशव्यापी संप पुकारला आहे.

 

आतातपर्यंत बँक व्यवस्थापनाकडून कर्मचारी संघटनांसोबत द्विपक्षीय चर्चा करून निर्णय घेतले जात होते. आता व्यवस्थापनाकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.  द्विपक्ष करारातील तरतूदीना धाब्यावर बसवून मनमानीपणे बँक व्यवस्थापन निर्णय घेत आहेत. त्या व्यवस्थापनाच्या धोरणांच्या विरोधात 19 नोव्हेंबर रोजी बॅंक कर्मचाऱ्यांनी (Bank Employee) संप पुकारला आहे. (हे ही वाचा:- Digital Currency: भारताला मिळणार डिजिटल चलन, रिझर्व्ह बँक आज करणार सादर; नेमका कोणाला होणार फायदा?)

 

तरी बॅंकेच्या व्यवहारांवर या संपाचा मोठा परिणाम होणार आहे. कारण दिवाळीच्या कालावधीत सलग ६ दिवस बॅंकेंना सुट्ट्या होत्या. तर आता  १९ नोव्हेंबरला संप आहे  आणि दुसऱ्या दिवशी २० नोव्हेंबरला रविवार आहे. म्हणून देशभरात सलग दोन दिवस बॅंक बंद असणार आहे तरी सर्वसामान्यांच्या अर्थिक व्यवहारावर या संपाचा चांगलाचं फटका बसणार आहे.