केंद्र सरकार कडून 15 मार्च दिवशी घोषणा करून मोफत आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्याला 14 जूनची डेडलाईन देण्यात आली होती. आज पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची ही सुविधा मोफत आहे. दरम्यान 10 वर्ष जुनं आधार कार्ड असणार्यांना माहिती अपडेट करणं गरजेचं आहे. आधार कार्ड मध्ये तुमचा पत्ता, नाव आणि अन्य तपशील योग्य असणं आवश्यक आहे. हे बदल मोफत करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 14 जून पर्यंतच विनाशुल्कची सोय देण्यात आली आहे.
आधार अपडेट ऑनलाईन करण्याची सुविधा सहज आणि सुलभ आहे. UIDAI च्या दाव्यानुसार, आधार कार्डची विश्वार्हता ठेवण्यासाठी युजर्सची योग्य माहिती देखील अपडेट ठेवणं गरजेचे आहे. त्यामुळे आयडेंटीडी प्रुफ आणि पत्ता ऑनलाईन अपडेट करणं आवश्यक आहे. मागील 10 वर्ष हे बदल न केलेल्यांनी ते अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. myaadhaar.uidai.gov.in या आधारच्या अधिकृत वेबसाईट वर ही माहिती अपडेट करण्याची सोय आहे. त्यासाठी काही आवश्यक माहिती द्यावी लागते. उद्यापासून या सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
Aadhaar card updates आता या मोफत अपडेटच्या डेडलाईन नंतर myAadhaar portal वर अपडेट करता येणार आहेत.त्यासाठी 50 रूपये मोजावे लागणार आहेत. Aadhaar Card Details Verification: आधार कार्ड चे तपशील तपासण्यासाठी आता QR Code Scan चा पर्याय .
Address Proof मोफत कसा कराल अपलोड?
- myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या.
- तुमच्या अकाऊंट मध्ये लॉग़िन करा आणि नाव, लिंग, जन्मतारीख. आधार अपडेट निवडा.
- Aadhaar card update online चा पर्याय निवडा.
- दरम्यान यासाठी काही कागदपत्रं तुम्हांला स्कॅन करून अपलोड देखील करावी लागणार आहेत.
- तुम्हांला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर दिला जाईल तो सेव्ह करून ठेवा. तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक कन्फरमेशन मेसेज दिला जाईल.
अंतिम मुदतीपूर्वी या मोफत अपडेट सेवेचा लाभ घेऊन तुमच्या आधार कार्डची अचूकता सुनिश्चित करा.