
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) महागाई भत्ता (Dearness Allowance) मध्ये 3 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. 3 टक्के वाढीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के डीए (DA) च्या स्वरुपात मिळेल. यामुळे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात 6750 रुपयांपर्यंत वाढ होईल.
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता मिळेल. डीएचे हे दर यावर्षी जुलैपासून लागू झाले होते. जर केंद्र डीएच्या दरात 3 टक्के वाढ करत असेल तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के डीए मिळेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ मासिक वेतन 18,000 रुपये ते 2,25000 रुपये या दरम्यान असते. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 81,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो पगार, जाणून घ्या सविस्तर)
केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक मूळ वेतनाच्या आधारे डीए मध्ये 31 टक्क्यांपर्यंत वाढीनंतर पगारवाढ होईल. जेव्हा डीएचा दर 31 टक्के निश्चित केला जातो, तेव्हा 18,000 रुपयांच्या मूळ वेतनास पात्र असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या मासिक पगारामध्ये 540 रुपयांची मासिक वाढ मिळेल. त्याचप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्याला मूलभूत वेतन म्हणून 2,25,000 रुपये मिळतील त्याला त्याच्या पगारामध्ये मासिक 6,750 रुपयांची वाढ मिळेल.
DA मध्ये 31 टक्के वाढीनंतर इतकी होईल पगारवाढ:
कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये
विद्यमान महागाई भत्ता (28%) रु. 5040/महिना
नवीन महागाई भत्ता (31%) रु. 5580/महिना
फरक: 5580-5040 = रुपये 540/महिना
कर्मचाऱ्याचे मूळ वेतन रु. 2,25,000 रुपये
विद्यमान महागाई भत्ता (28%) 63,000/महिना
नवीन महागाई भत्ता (31%) Rs.69,750/महिना
फरक: 69,750 - 63,000 = 6,750/महिना
दरवर्षी साधारणपणे सरकारकडून दोनदा डीएमध्ये वाढ करण्यात येते- जानेवारी आणि जुलै मध्ये. आतापर्यंत जुलै-डिसेंबर 2021 साठी पगारवाढीची घोषणा झालेली नाही. रिपोर्टनुसार, सरकार DA मध्ये 3 टक्के वाढ जाहीर करू शकते.