7th Pay Commission: केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खूश खबर आहे. कर्मचाऱ्यांच्या (Central Employees महागाई भत्त्यात (Dearness Allowance ) वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारद्वारे लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. येत्या 1 जुलैपासून ही वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.यासोतच कर्मचाऱ्यंच्या फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटना पाठिमागील प्रदीर्घ काळापासून फिटमेंट फॅक्टर वाढविण्याची मागणी करत होते. सध्यास्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळतो. जो वाढून 3.68 पट करण्याची मागणी होत आहे. जर असे होते तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही मोठी वाढ होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करताना विविध भत्ते ज्यामध्ये डीए, टीए आणि हाऊस रेंट अलाउन्स (HRA) कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात विचार करुन फिटमँट फॅक्टरने गुणले जाते. फिटमेंट फॅक्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होते. जर सरकारमध्ये फिटमँट फॅक्टरला 2.57 वरुन वाढून 3.68 होईल अशी आशा आहे. किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांवरुन वाढ होत 26 हजार रुपये होईल. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारने या आधी 2017 मध्ये एण्ट्री लेवल वर बेसिक पे सात हजार रुपये प्रति महिन्यावरुन वाढ करत 18, 000 रुपये करण्यात आला होता. दरम्यान, किमान बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे आणि अधिकाधिक बेसिक सॅलरी 56900 रुपये आहे.