Pangong lake मधून चीनी सैन्य माघारी, टेंट काढत टॅंक घेत  असलेल्या  PLA जवानांचा व्हिडिओ प्रसिद्ध (Watch Video)
Indian and Chinese troops and tanks disengaging from the banks of Pangong lake

सुमारे 10 महिन्यांनंतर पूर्व लद्दाख मधील पेगॉंग झील (Pangong lake area) भागामधून आता भारत आणि चीन या दोन्ही सैन्यदलाकडून आपलं सैन्य आणि इतर टॅंक मागे घेण्यास सुरूवात झाली आहे. आता या सैन्य मागे घेत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. चीनी पिपल्स लिबरेशन आर्मी कडून मागील वर्षी पेगॉंग झील भागात उत्तर भागात असलेल्या फिंगर 4 मध्ये कब्जा केला होता. तसेच एलएसी वर देखील बदल केले होते. यावर भारतानेही चोख उत्तर देत या भागात सैन्यबळ वाढवलं होतं.

भारतीय सेनेच्या नॉर्थन कमांड द्वारा जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये हे स्पष्ट दिसतं की चीनी सैनिक मागे हटण्यासोबतच तेथे बनवलेले शेल्टर देखील नष्ट करत आहेत. तसेच संरचनेला देखील कब्जा करण्यापूर्वी त्यांनी असलेल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये भारत आणि चीन कमांडरमध्ये काही बैठका झाल्या. त्या सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली होती त्यानुसारच आता हे होत असल्याचे समजते आहे. Rahul Gandhi यांचा Narendra Modi यांच्यावर पुन्हा हल्लाबोल; पूर्व लद्दाख मध्ये पंतप्रधानांनी चीन ला भारताची जमीन दिल्याचा दावा.

भारत चीनच्या समझोत्याप्रमाणे चीन ला उत्त्र किनार्‍यावर फिंगर 8 च्या पूर्व भागात असलेल्या सैनिकांना घेऊन जायचं आहे तर भारतीय सेना फिंगर 3 जवळ धन सिंह थापा पोस्ट स्थित अड्ड्यावर परतणार आहेत. याप्रमाणेच झील च्या दक्षिणी किनार्‍यावर देखील कारवाई होणार आहे.  पेगॉंगच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये ही कारवाई पूर्ण होण्यासाठी अजून आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर त्याची चाचपणी केली जाईल. ड्रोन आणि सॅटलाईट फोटोंच्या मदतीने ते पाहिले जाणार आहेत.