केंद्र सरकारच्या (Central Govt) कर्मचाऱ्यांच्या (Employee) पगारात (Salary) लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए (DA) 31 टक्के झाला आहे. पूर्वी तो 28 टक्के होता. डीए (DA) वाढवल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या वेतन श्रेणीनुसार वाढणार आहे. या वाढीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 95 हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात केलेली वाढ 47.14 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या मूळ वेतन आणि श्रेणीनुसार वाढतो हे स्पष्ट केले आहे.
लेव्हल 1 मधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा पगार 18,000 ते 56,900 रुपये आहे आणि जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा पगार 18,000 रुपये असेल तर कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ 30,240 रुपये असेल. तसेच 56,900 पगारदार कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात 95,592 रुपयांची वाढ होणार आहे. येथे आम्ही तुम्हाला पगारवाढीची गणना सांगणार आहोत. (हे ही वाचा 7th Pay Commission: दिवाळी पूर्वी केंद्रीय कर्मचा-यांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट, पाहा काय आहे ही खुशखबर!.)
किमान मूळ पगाराची गणना
- कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रु
- नवीन महागाई भत्ता (31%) रु. 5580/महिना
- आजपर्यंतचा महागाई भत्ता (17 टक्के) रु.3060/महिना
- यामुळे महागाई भत्ता 5580-3060 = रु. 2520/महिना वाढला
- वार्षिक पगार वाढ 2520X12 = 30,240 रु
कमाल मूळ पगाराची गणना
- कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 56900
- नवीन महागाई भत्ता (31%) रु 17639/महिना
- आतापर्यंत महागाई भत्ता (17 टक्के) रु 9673/महिना
- महागाई भत्ता इतका वाढला 17639-9673 = रु 7966/महिना
- वार्षिक पगारवाढ 7966X12 = रु 95.59
केंद्र सरकारच्या घोषणेनुसार, या वर्षी 1 जुलैपासून महागाई भत्त्यात नवीन वाढ लागू करण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी जुलैमध्येच महागाई भत्ता (DA) 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता. त्यानंतर आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 31 टक्के डीए (DA) मिळणार आहे.