7th CPC: कोरोना व्हायरसच्या ((Coronavirus) काळात केंद्र कर्मचा-यांना (Central Government Staff) महाभाई भत्त्यात काही विशेष वाढ मिळाली नाही. मात्र तरीही अन्य पद्धतींनी मोदी सरकारने अनेक कर्मचा-यांना विशेष सवलती देऊन खूश केले आहे. यात मान्यताप्राप्त LTC साठी मोजण्यात येणा-या करामध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे DA मध्ये सवलत न दिले असले तरी इन्कम टॅक्समध्ये केलेल्या सवलतीत ती कसर भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस आणि त्यामुळे राष्ट्रव्यापी लॉकडाऊन मुळे यंदा केंद्र कर्मचारी कोणताही लांबचा विमान प्रवास वा रेल्वे प्रवास करु शकले नाही. त्यामुळे त्यासंबंधीचे केंद्र सरकारकडून मिळणा-या फायद्यांचा लाभही त्यांना घेता आला नाही. त्यामुळे LTC मध्ये त्यासाठी देण्यात येणा-या भाड्यावर कर माफ करण्यात आला आहे. हेदेखील वाचा- 7th Pay Commission: महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह 6 अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 नोव्हेंबर पासून लागू होणार
केंद्राच्या कर्मचा-यांना सरकारकडून देण्यात आलेल्या या सवलतीचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारने 12 ऑक्टोबरला आपल्या कर्मचा-यांना एलटीसीवरील करमाफ करण्यासाठी विशेष वाउचर देण्याची घोषणा केली होती. या योजनेचा उपयोग करणा-या कर्मचा-याला 31 मार्च 2021 आधी दिलेल्या प्रवासी भाड्यावर तिप्पट आणि सुट्ट्यांवर 1% सामान/ सेवा खरेदी कराव्या लागतील. या योजनेसाठी हे देखील आवश्यक आहे की, याचे पैसे डिजिटल मोड माध्यमातून जीएसटी पंजीकृत विक्रेत्याकडून 12% वा त्यापेक्षा अधिक जीएसटी वरील सामानावरच केले जावे. याचा लाभ घेण्यासाठी कर्मचा-यांना जीएसटी चलान दाखवावे लागेल.
सरकारने 2018-21 दरम्यान देण्यात आलेल्या एलटीसीवर ही सवलत देण्याचा ठरवले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचा-याच्या श्रेणीनुसार ही सवलत देण्यात येईल.