HC On Sex Outside Marriage: राजस्थान उच्च न्यायालयाने लैगिंक संबंधा संदर्भात निर्णय घेतला आहे. कोर्टाने म्हटले आहे की, दोन सज्ञान जोडप्यामध्ये परस्पर संमतीने जर शारिरिक संबंध प्रस्तापित होत असतील तर हा कायदेशीर गुन्हा नाही. न्यायमूर्ती बिरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, जेव्हा दोन प्रौढ विवाहबाह्य संमतीने लैंगिक संबंध ठेवतात. तेव्हा तो कायदेशीर गुन्हा नाही. (हेही वाचा- पतीच्या विवाहबाह्य लैंगिक संबंधांबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,)
राजस्थान न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, जर दोन प्रौढ व्यक्ती लग्नानंतर दुस-यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असतील तर असे संबंध आयपीसीच्या कलम 494 च्या कक्षेत येणार नाहीत. कारण दोघांपैकी कोणीही आपल्या जोडीदाराच्या हयातीत दुसरे लग्न केलेले नाही.
Adults having sex outside marriage is not an offence: Rajasthan High Court
report by @satyendra_w https://t.co/XZ7ejqjRZb
— Bar & Bench (@barandbench) April 1, 2024
वास्तविक, एका पतीने पत्नीच्या अपहरणाची केस राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती, पण जेव्हा हे प्रकरण न्यायालया समोर आले तेव्हा पत्नीने सांगितले की, तिचे कोणीही अपहरण केले नाही. ती स्वत:च्या मर्जीने त्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. यावर सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, महिलेने आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे, त्यामुळे हा आयपीसी कलम 494 आणि 497 अंतर्गत गुन्हा आहे.
या प्रकरणात वकिलाने न्यायालयाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, एक प्रौढ महिला तिच्या इच्छेशी लग्न करू शकते आणइ तिला पाहिजे त्यासोबत राहू शकते. शारिरीक संबंध पक्त विवाहित जोडप्यामध्येच घडले पाहिजेत हे खरे आहे, परंतु विवाहाबाहेरील दोन प्रौढांमधील सहमतीने संबंध गुन्हा ठरत नाहीत. त्यामुळे आयपीसीच्या कलम 366 अंतर्गत कोणताही गुन्हा केलला नाही आणि एफआयआर रद्द करण्यात आला आहे.