दिल्ली उच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधाबाबत आज एक महत्वाचा निर्णय दिला. कोर्टाने म्हटले की, हिंदू विवाह कायदा विशेषत: व्यभिचाराला घटस्फोटाचे कारण म्हणून ओळखतो, त्यामुळे न्यायालयाने केवळ गोपनीयतेच्या अधिकाराच्या आधारावर विवाहित पुरुषाच्या मदतीला यावे आणि त्याच्या व्याभिचाराकडे कानाडोळा करावा हे सार्वजनिक हिताचे नाही. या पुरुषावर विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या जोडप्याचे 1998 मध्ये लग्न झाले होते, मात्र, गेल्या वर्षी पत्नीने फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. तिने पतीविरुद्ध व्यभिचार आणि क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागितला आणि व्यभिचाराच्या संबंधातून आपल्या पतीला एक मूलही असल्याचा आरोप केला.

आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे म्हणून पत्नीने एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करता यावे याबाबत फॅमिली कोर्टाला विनंती केली होती, जी कोर्टाने मान्य केली होती. फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती व म्हटले होते की पत्नीने मागितलेली माहिती उघड करणे हे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. आता उच्च न्यायालयानेही पतीची ही याचिका फेटाळली आहे. (हेही वाचा: Mosquito Bite: 'डास चावणे हा 'अपघात' नाही, त्याचा Accident Insurance Policy अंतर्गत समावेश होऊ शकत नाही'- Calcutta High Court)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)