अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्काराच्या परिभाषेबद्दल नुकताच दिलेला एक निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. न्यायालयाने म्हटले आहे, अल्पवयीन मुलीचे गुप्तांग पकडणे, , तिच्या पायजम्याची नाडी काढणे आणि तिला ओढण्याचा प्रयत्न करणे हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी अशा कृत्यांना गुन्ह्याची ‘तयारी’ आणि ‘गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न’ यातील फरक म्हटले आहे. त्यांनी कनिष्ठ न्यायालयाने निश्चित केलेल्या अधिक गंभीर आरोपात बदल करण्याचे आदेश दिले.
न्यायाधीशांनी सांगितले की, बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप सिद्ध करण्यासाठी, हे सिद्ध करावे लागेल की खटला गुन्ह्यासाठी केलेल्या तयारीच्या पलीकडे आहे. तयारी आणि प्रत्यक्ष प्रयत्न यात फरक आहे. या प्रकरणी आरोपी आकाशवर पीडितेला कल्व्हर्टखाली ओढून नेल्याचा आणि तिच्या पायजम्याची नाडी ओढल्याचा आरोप आहे. यावर न्यायाधीशांनी म्हटले की, असे कृत्य घडले असले तरी, साक्षीदारांनी असे म्हटले नाही की यामुळे पीडितेचे कपडे निघाले. तसेच आरोपीने 'पेनिट्रेटिव सेक्स' करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप नाही.
HC on Attempt to Rape Case:
Allahabad High Court recently held that actions such as grabbing a child victim's breasts, breaking the string of her pyjama, do not constitute the offence of rape or attempt to rape, as per a report.
Read: https://t.co/0R5PlIkY8E pic.twitter.com/qKjphfWtid
— The New Indian Express (@NewIndianXpress) March 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)