डास चावणे हा 'अपघात' नाही आणि त्यामुळे त्याचा अपघात विमा पॉलिसीमध्ये समावेश करता येणार नाही, असे कलकत्ता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत डासाच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्यावरही अपघाती हक्काचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते. कोलकाता येथील मौसमी भट्टाचार्जीच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, डास चावल्यामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांचाही विम्यामध्ये समावेश असावा. त्यानंतर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले होते की, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार मोझांबिकमध्ये मलेरियामुळे होणारे मृत्यू सामान्य आहेत. अशा परिस्थितीत तेथे डास चावल्यामुळे झालेला मृत्यू हा अपघात मानला जाणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)