Excavation Process at Qutub Minar: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत असलेल्या कुतुबमिनार (Qutub Minar) परिसरात उत्खनन (Excavation) होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कुतुबमिनारमध्ये मूर्तींचे Iconography करण्याचे निर्देश दिले आहेत. कुतुबमिनार परिसरातील अहवालाच्या आधारे उत्खनन सुरू होणार आहे. ASI उत्खननासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला अहवाल देईल.
सांस्कृतिक सचिवांनी शनिवारी अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या भेटीत हे निर्णय घेतले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनाराच्या दक्षिणेला असलेल्या मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खनन सुरू केले जाऊ शकते. (हेही वाचा - Gyanvapi Masjid Case: ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात अजून अनेक शिवलिंग; मंदिराच्या माजी महंताचा दावा)
आयकॉनोग्राफी म्हणजे काय?
आयकॉनोग्राफी ही कला इतिहासाची एक शाखा आहे. जी प्रतिमांच्या सामग्रीची ओळख, वर्णन आणि व्याख्या यांचा अभ्यास करते. काही दिवसांपूर्वी साकेत कोर्टात कुतुबमिनार परिसरात असलेल्या कुव्वुतुल इस्लाम मशिदीमध्ये हिंदू देवतांची जीर्णोद्धार आणि पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यावर 24 मे रोजी साकेत न्यायालयात सुनावणी होणार आहे.
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने 27 मंदिरे अर्धवट पाडली होती आणि या सामग्रीतून परिसरात कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधली होती. सध्या काशीतील ज्ञानवापी सर्वेक्षणाबाबत देशभरात संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीतील कुतुबमिनारचे उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुतुबमिनार उत्खननाचा निर्णय का घेण्यात आला?
उत्खननाचा निर्णय घेण्यापूर्वी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी 12 जणांच्या पथकासह कुतुबमिनार संकुलाची पाहणी केली. टीममध्ये 4 ASI अधिकारी, 3 इतिहासकार आणि संशोधक उपस्थित होते. ASI अधिकाऱ्यांनी सांगितले की, 1991 पासून कुतुबमिनारचे उत्खनन झालेले नाही. अनेक संशोधने अद्याप प्रलंबित आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील कुतुब मिनारवरील आयसीएचआरचे संचालक ओम जी उपाध्याय यांनी त्यांच्या वक्तव्यात कुतुबमिनारला हिंदू मिनार म्हटले होते. 1871-72 च्या त्या सर्वेक्षण अहवालात मिनारच्या आत काही कलाकृती असल्याचे सांगण्यात आले, ज्यावरून असे सूचित होते की मिनार सम्राट अशोकाच्या काळातील आहे. या सर्वेक्षणात कुतुबमिनार हा सम्राट अशोकाच्या काळापूर्वीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.