प्रोफेशनल शिक्षण पूर्ण होण्यासह तरुण मंडळी नोकरीच्या शोधासाठी प्रथम सीव्ही तयार करण्यामागे लागतात. त्यामुळे उत्तम जर सीव्ही असल्यास नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते. अशातच जर तुम्ही प्रथमच नोकरीसाठी सीव्ही तयार करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे. त्याबद्दलच आम्ही आज तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(HSC/SSC Exams परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत पालक, शिक्षक प्रतिनिधींशी चर्चा- वर्षा गायकवाड)
रेज्युमे बनवताना तुम्हाला सुरुवातीला काही वेळ इंटरनेटवर घालवावा लागणार आहे. त्यावेळी तुम्हाला सीव्ही बनवण्यासाठी काही वेबसाईट दिसतील त्या तुमच्या कामी येऊ शकतात. तीन-चार वेबसाइटवरील सीव्ही तयार करण्याची पद्धत कळली की तुम्ही तो बनवू शकता. त्यानंतर तुमच्या स्किल्सची एक लिस्ट तयार करा. ज्या नोकरीच्या संदर्भात मिळत्याजुळत्या असतील. त्यामुळे नोकरीसाठी उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत तुमची पुढे राहू शकता. तसेच तुमच्या स्किल्स हायलाइट करण्यास विसरु नका.
ज्या कंपनीत तुम्ही नोकरीसाठी अर्ज करणार आहात त्यांच्या बद्दल थोडे सर्च करा. त्याचसोबत कंपनीत काम करणारा एखादा तुमच्या ओळखीचा असल्यास त्याच्याकडून माहिती जाणून घ्या. असे केल्याने तुम्हाला कळू शकते की, कंपनी कोणत्या आधारावर उमेदवारांची निवड करते. त्याचसोबत कंपनीच्या कोणत्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा एकदा तपासून पहा.(Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बॅंक मध्ये 150 कनिष्ठ अधिकार्यांची भरती होणार; 19 मार्च पर्यंत saraswatbank.com वर करा ऑनलाईन अर्ज)
त्याचसोबत रेज्युमे बनवताना अनुभवी प्रोफेशनल्सशी बातचीत करा. तसेच कंपनीने उमेदवारांची निवड करण्यासाठी ज्या अटी आणि नियम दिल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुम्हाला शैक्षणिक वर्षादरम्यान जे काही अवॉर्ड मिळाले असतील त्याच्या सुद्धा उल्लेख तुम्ही सीव्ही मध्ये करा.