Tirunelveli Collector Shilpa Prabhakar Satish

हायफाय शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेतल्यानंतरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. अशा शाळांमधूनच त्यांना करिअरसाठी भविष्याची कवाडे उघडी होणार आहेत, असा आपल्यापैकी अनेक पालकांचा समज. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये किंवा गलेलठ्ठ शुल्क आकारणाऱ्या शाळांमध्ये मुलांची रवानगी करण्याचा पालकांचा कल दिसतो. पण, तामिळणाडू राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्याच्या जिल्हधिकारी (Tirunelveli Collector) शिल्पा प्रभाकर सतीश (Shilpa Prabhakar Satish) याला अपवाद ठरल्या आहेत. शिल्पा केवळ उपवादच ठरल्या नाहीत तर, त्यांनी आपल्या कृतीतून आपली भाषा, समाज, संस्कृती याच्याशी कसे एकनिष्ठ राहता येते याचा एक धडाच घालून दिला आहे. शिल्पा यांनी आपल्य मुलीला शिक्षणासाठी चक्क अंगणवाडी (Anganwadi) केंद्रामध्ये दाखल केले आहे. शिल्पा या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत ज्या अंगणवाडीच्या मोठ्या समर्थक आहेत. अंगणवाडी केंद्र म्हणजे एक प्रकारचे बाल विकास केंद्रच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

मुलीला तुम्ही सकरकारी अंगणवाडीतच का घातले असे विचारताच शिल्पा प्रभाकर सतिश सांगतात, आम्हीच (सरकार) तर अंगणवाडीच्या वाढीला, विकासाला आणि प्रसाराला चालना देतो. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीने समाजातील सर्व वर्गांच्या मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. तिने लवकरात लवकर तामिळ भाषा शिकली पाहिजे. अंगणवाडीमध्ये सर्व सुविधा असतात. हे केंद्र माझ्या घरापासून अगदी जवळ आहे. इथले सर्व शिक्षक चांगले आहेत. माझी मुलगी येथे सर्व लोकांना भेटते. मिळवून मिसळून राहते. खेळते. हे माझ्यासाठी आणि तिच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचे आहे, असेहीत्या सांगतात.

पुढे बोलताना शिल्पा यांनी सांगितले की, तिरुनेलवेलीमध्ये काही हजार अंगणवाडी आहेत. या सर्व अंगणवाडी केंद्रातील सर्व शिक्षक चांगले आहेत. जे मुलांची काळजी घेतात. तसेच, मुलांच्या खेळासाठी त्यांच्याकडे पायाभूत सुविधाही आहेत. शिल्पा या 2009 च्या आयएएस बॅचच्या जिल्हाधिकारी आहेत. (हेही वाचा, करिअर निवडण्यापूर्वी हे '४' प्रश्न स्वतःला अवश्य विचारा !)

दरम्यान, जिल्हाधिकारी शिल्पा प्रभआकर सतीश यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर कौतुकाचा चौफेर वर्षाव होतो आहे. दुसऱ्या बाजूला त्यांची मुलगी ज्या अंगणवाडी केंद्रात जाते त्या परिसरातील नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसेच, त्या अंगणवाडी केंद्रातील इतर मुलांचे पालकही विशेष समाधानात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची कन्या आपल्या मुलांसोबत शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांच्या अंगणवाडी केंद्रात त्यांच्या गुणांना वाव मिळेल असे या पालकांना वाटते.