करिअर निवडण्यापूर्वी हे '४' प्रश्न स्वतःला अवश्य विचारा !
करिअर (Photo Credits: Facebook)

आयुष्यात करिअर हा महत्त्वाचा टप्पा आहे. पण त्याची योग्य दिशा योग्य वेळी मिळणे फार महत्त्वाचे आहे. पण करिअर निवडीच्या बाबतीत अनेक मुलं कन्फुज असतात. त्यात पालकांचा दबाव, प्रत्येकाचे वेगवेगळे सल्ले यामुळे तर त्यांचा पुरता गोंधळ उडतो. चुकीच्या करिअर निवडीचा परिणाम माणसावर सर्वच पातळ्यांवर होतो. त्यामुळे करिअरची निवड लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे.

आजकाल पालक, विद्यार्थी दोघंही सजग झाल्यामुळे करिअरची निवड करण्यापूर्वी करिअर काऊंन्सिलरचा सल्ला घेतला जातो. पण तुम्ही स्वतःला जितकं ओळखता त्यापेक्षा अधिक चांगलं तुम्हाला कोणी ओळखत नाही. त्यामुळे करिअर निवडण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. त्यामुळे करिअरची निवड करण्यात तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर पाहुया काय आहेत हे प्रश्न...

# मी कोणते काम न कंटाळता करु शकतो/शकते? हा प्रश्न करिअर निवडीपूर्वी प्रत्येकाने स्वतःला विचारावा. त्याचबरोबर कोणते काम करणे तुम्हाला मनापासून आवडेल याचे ही आत्मपरिक्षण करा. तुम्ही जर तुमच्या आवडीने, मनाप्रमाणे करिअरची निवड केलीत तर तुम्ही अधिक चांगले काम करु शकाल. आणि मग करिअरला योग्य दिशा मिळेल व यश संपादन करण्यापासून तुम्हाल कोणी अडवू शकणार नाही.

# मी प्रवेश घेत असलेल्या कोर्सचा मला माझ्या करिअरमध्ये कितपत फायदा होईल? हा प्रश्न स्वतःला विचारुन त्याची शहानिशा करुन मगच कोर्सला प्रवेश घ्या. विनाकारण कोणत्याही कोर्समध्ये पैसे, वेळ वाया घालवू नका.

# मी प्रवेश घेत असलेला कोर्स माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण प्रत्येकाचे व्यक्तीत्व वेगवेगळे असते. त्यामुळे मित्र/मैत्रिण एखाद्या कोर्सला अॅडमिशन घेतातेह म्हणून त्या कोर्सला अॅडमिशन घेऊ नका.

# १० वर्षांनंतर मी स्वतःला कुठे बघता? यावर तुमचे करिअर अवलंबून असते. त्यामुळे हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारा. या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनात स्पष्ट झाले तर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत घेऊ शकता. करिअरची ब्लू प्रिंट तुमच्याकडे तयार असेल तर भविष्यातील तुमची प्रगती कोणी रोखू शकणार नाही.