SSC Exam Calendar 2020-21: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून महत्त्वाच्या परीक्षा  तारखांबद्दल नोटिफिकेशन जारी
SSC Calendar 2020-21 | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)कडून आज (17 सप्टेंबर) 2020 या वर्षीसाठीच्या सरकारी नोकरी बद्दल महत्त्वाच्या तारखांमध्ये एक नोटिफिकेशन जारी केले आहे. आज SSC ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन (Selection Posts Examination), दिल्ली पोलिस सब इन्स्पेक्टर, CAPFs परीक्षा आणि ज्युनियर हिंदी भाषांतरकार(Junior Hindi Translator), ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा ( Junior Translator and Senior Hindi Translator Examination) ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून इतर परीक्षा म्हणजेच ज्युनियर इंजिनियर ( सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अ‍ॅन्ड क्वॅन्टिटी सर्व्हेईंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) परीक्षा, स्टेनोग्राफर ग्रेड सी (Stenographer Grade ‘C’) आणि डी (D) परीक्षा, कम्बाईंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (Combined Graduate Level Examination), कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन (Combined Higher Secondary Level Examination) अ‍ॅन्ड मल्टी टास्किंग़ स्टाफ एक्झामिनेशन (Multi Tasking (Non-Technical) Staff Examination) यांचे वेळापत्रक 4 दिवसांनंतर म्हणजे 22 सप्टेंबर दिवशी जाहीर केले जाणार आहे.

इथे पहा ऑफिशिएल नोटिफिकेशन

CHSL परीक्षा 2019 साठी परीक्षार्थींना त्यांचं परीक्षा केंद्र बदलण्यासाठी एसएससीकडून 18 सप्टेंबर पासून विंडो ओपन केली जाणार आहे. दरम्यान 18-20 सप्टेंबर पर्यंत परीक्षा केंद्र बदलता येणार आहेत. यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा बर्थ डेट च्या माध्यमातून लॉग ईन करता येईल.