प्रातिनिधिक प्रतिमा (File Photo)

सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई (MSC Bank Recruitment 2020) येथे अनेक पदांची नोकर भारती होणार आहे. लिपिक, कनिष्ठ अधिकारी यांच्यासह अन्य पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एमएससी बँक mscbank.com च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. एमएससी बँक भरती 2020 संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून अधिसूचना डाउनलोड करु शकतात. अधिसूचनेत भरतीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

एमएससी बँक भरती 2020 अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2020 आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, लिपिक व अधिकारी श्रेणी II च्या 164 जागांसाठी पात्र उमेदवारांची भरती होईल. शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा नमुना, पगार, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात. याबाबत नवीन अपडेट्स येताच ते अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

पात्रता –

> लिपिक, कनिष्ठ अधिकारी आणि अधिकारी वर्ग II च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सीएस/आयटी ट्रेडमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

> सोबतच एमसीएची पदवी प्राप्त केलेले उमेदवारदेखील यासाठी अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा -

> प्रशिक्षणार्थी सह व्यवस्थापक/प्रशिक्षण अधिकारी ग्रेड II च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 ते 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

> प्रशिक्षणार्थी सह अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

> प्रशिक्षणार्थी लिपीक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 21 वर्षांपेक्षा कमी व 28 वर्षांपेक्षा जास्त नसावेत. (हेही वाचा: Government Job: केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 6.83 लाख पदे रिक्त, लवकरच होणार भरती- राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती)

कारकुनासह अन्य पदांसाठी अर्ज करण्यासाठी आधी अधिकृत संकेतस्थळ Mscbank.com ला भेट द्या. वेबसाइटच्या होमपेजवर दिसणार्‍या एमएससी बँक भरती 2020 च्या दुव्यावर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज उघडेल. नवीन पानावर सांगितलेली सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. सबमिट बटणावर क्लिक करताच, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. पुढे गरज लागल्यास सवेत म्हणून, नोंदणी फॉर्मचे प्रिंटआउट स्वतःजवळ बाळगा.