International Literacy Day 2019: जागतिक साक्षरता दिन सुरुवात, महत्त्व आणि साक्षरतेची गरज
International Literacy Day 2019 | (Photo Credits: PixaBay)

International Literacy Day 2019: एक काळ होता जगामध्ये शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी होतो. इतके की अगदी नसल्याप्रमाणेच. इथे शिक्षणाचा अर्थ अक्षर ओळख आणि शालेय शिक्षण असा मर्यादित नसून व्याप्त स्वरुपात अपेक्षीत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून साक्षरता (Literacy) वाढविण्यासाठी आणि परिणामी निरक्षरता कमी करण्यासाठी जगभरातील देशांनी पुढाकार घेतला. यात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (United Nations Educational Scientific and Cultural Organization) म्हणजेच युनेस्कोचा (UNESCO) मोठा वाटा होता. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. हे ठरवत असताना शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व अधोरेखीत करणे हा उद्देश होता.

शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व जगभरात पटवून देण्यासंदर्भात युनेस्कोमध्ये एकमत झाले. त्यानंतर 7 नोव्हेंबर इ.स. 1965 रोजी युनेस्कोत बहुमताने निर्णय झाला. त्यानंतर 8 सप्टेंबर इ.स.1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. म्हणजे 8 सप्टेंबर इ.स. 1966 हा दिवस पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यंदाचा जागतिक साक्षरता दिन हा 53 वा आहे.

साक्षरता दिन महत्त्व

मानवी समाजाचा विकास होऊन तो अधिकाधिक सुसंस्कृत बनावा. समजात शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांकडून अज्ञानी लोकांची होणारी फसवणूक, पिळवणूक, शोषण आदींपासून त्यांची मुक्तता व्हावी. यासाठी जगभराती देश प्रयत्नरत आहेत. म्हणूनच युनेस्कोनेही यावर विचार करुन आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याचे ठरवले. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. जगभरातील जन्मदर कमी करुन लोकसंख्येला आळा घालणे, लैंगिक समानता, व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा उंचवावणे या गोष्टीही साक्षरतेशी निगडीत आहेत. म्हणूनच आजही आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे प्रचंड महत्त्व आहे.

साक्षरतेचा अर्थ काय?

साक्षरतेचा अर्थ केवळ लिहिणे वाचणे नव्हे. तर, लोकांन आपल्या कर्तव्याप्रती जागृक करुन सामाजिक परिवर्तानाचा अविभाज्य घटक बनविणे हा आहे. धक्कादायक असे की, जगभराच्या तुलनेत आज शिक्षित लोकांची संख्या जवळपास 4 अब्जाहून अधिक आहे. तरीही आज तब्बल 1 अब्ज लोकांना लिहिता वाचता येत नाही, असे सांगतात. त्यामळे जगभरात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी साक्षरतेचे अत्यंत महत्त्व आहे. (हेही वाचा, शिक्षक दिन 2019: Teachers' Day निमित्त Google होम पेजवर खास Doodle)

भारतातील साक्षरता प्रमाण

प्राप्त माहतीनुसार, भारतात साक्षरतेचा दर हा 74.04% इतसा असल्याचे सांगितले जाते. हाच आकडा राज्यनिहाय पडताळायचा तर केरळ राज्यात सारक्षरतेचे प्रणाण सर्वाधिक म्हणजेच 93.91% इतके आहे. तर, देशात सर्वाधिक कमी साक्षरता असलेल्या राज्याचे प्रमाण हे 63.82 % इतके आहे. अर्थात, कालानुरुप त्यात बदल होतो आहे. पण, त्याचा वेग अद्यापही म्हणावा तसा वाढताना दिसत नाही.