Teachers' Day 2019 Google Doodle | (Photo Credit: Google)

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा आज (5 सप्टेंबर 2019) जन्मदिन. देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teacher's Day) म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज या खास दिवशी जगातील इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही खास डूडल बनवत शिक्षक दिन आपल्या खास शैलीत साजरा केला आहे. आज गुगल डूडल (Google Doodle) रुपात एक छानसाच ऑक्टोपस दाखवला आहे. जो शिक्षकाच्या भूमिकेत दाखवला आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबत सांगायचे तर ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. डॉ. राधाकृष्णन हे एक महान विचारवंत, उत्तम शिक्षक, विद्वान आणि राजकीय नेते होते. राधाकृष्णन यांना भारताचा सर्वात मोठा आणि तितकाच मानाचा समजला जाणारा भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिन साजरा करण्याचे ठरवविले. तेव्हा विद्यार्थ्यांना उद्देशून राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, 'माझा दिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल.' प्रत्येक जण आपपल्या पद्धतीने आपल्या आयुष्यात आलेल्या गुरुचे आभार मानतो. आपल्या देशात 5 सप्टेंबर 1962 राजी पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला. (हेही वाचा, अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन Google Doodle, पंजाबी भाषेतील या लोकप्रिय कवयत्रीबद्दल घ्या जाणून)

सर्च इंजिन गूगल अनेक महत्त्वाच्या आणि खास दिवशी डूडल बनवते. शिक्षक दिनाचे औचित्य साधत आजही गूगलने खास डूडल बनवले आहे. डूडलमध्ये एक ऑक्टोपस समुद्रातील एका छोट्याशा माशाला शिकवताना दिसत आहे. डोळ्याला चश्मा लाऊन तो काही माशांना पुस्तक वाचून शिकवताना दिसतो. त्यानंतर दुसऱ्या हाताने गणीत आणि काही प्रश्न सोडवताना दिसत ओहे. तर, तीसऱ्या हातात रसायनशास्त्राचा प्रयोग करताना दिसत आहे. शिक्षक बनलेला ऑक्टोपस शेवटी काही माशांना रसायनशास्त्राचा एक प्रयोग करुन दाखवतानाही दिसत आहे. शिक्षक बनलेला ऑक्टोबस शेवटी काही माशांना एक शीट्सही देतो आहे. आजच्या डूडलमध्ये आठ पायांचा ऑक्टोपस दाखविण्यात आला आहे. डूडलमध्ये ऑक्टोपस दाखवण्याचे कारण म्हणजे एकच शिक्षक अनेक गोष्टी करतो, अनेक विषयांत पारंगत असतो असे दाखविण्याचा उद्देश आहे.