Coronavirus: परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्ती बाबतच्या शासन निर्णयाला स्थगिती- धनंजय मुंडे
Scholarships | |Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सामाजिक न्याय विभाग (Department of Social Justice) द्वारा देण्यात येणाऱ्या परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्ती (Scholarships) बाबतच्या 5 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर याबाबत सर्व समाजघटक, संघटना व सर्व संबंधित यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना विदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळावी तसेच या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस वाव मिळावा. त्यासाठी जगभरातील नामांकित विद्यापिठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. (हेही वाचा, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; परदेश शिष्यवृत्तीसाठी लागू केली सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा; गोरगरिबांच्या मुलांना मिळणार लाभ)

धनंजय मुंडे ट्विट

दरम्यान, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि जगभरातील अनेक देशांमध्ये कोरना व्हायरस संकटाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे जगभरातील शैक्षणिक संस्था, प्रशासन आणि इतर यंत्रणांवर मोठा ताण आहे. जगभरातील व्यवहार ठप्प आहेत. अशा स्थितीत केवळ शैक्षणिक क्षेत्रच नव्हे तर अवघ्या जगाच्या प्रगतिवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.