Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Central Railway Recruitment 2021:  जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण मध्य रेल्वेत 2532 रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार असल्याचे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ट्रेड अपरेंटिसच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून त्याची अंतिम तारखी 5 मार्च 2021 ठरवून दिली आहे. त्यामुळे वेळ न दवडता तुम्ही शासकीय नोकरीसाठी आजच अर्ज करु शकता. त्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ www.rrccr.com वर भेट द्यावी लागणार आहे.

या नोकरभरतीसाठी मुंबई, भुसावळ, पुणे, नागपू आणि सोलपुरसह अन्य विभागांतील रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर जाणून घ्या अर्ज करण्यासह अन्य काही महत्वाच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती.(RBI Office Attendant Recruitment 2021: आरबीआयमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, rbi.org.in वर करता येईल अर्ज)

-शैक्षणिक योग्यता

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून एकूण 50 टक्के गुणांसह 10 परीक्षा किंवा 12 वी परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

-वय

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षादरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्ष आणि ओबीसी उमेदवारांनी तीन वर्षावरील वयात सूट दिली जाणार आहे.(Capgemini Recruitment 2021: खुशखबर! यंदा दिग्गज आयटी कंपनी कॅपजेमिनी भारतामध्ये देणार 30,000 लोकांना नोकऱ्या)

-अर्ज शुक्ल

अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. हा शुल्क तुम्ही ऑनलाईन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, एसबीआय चलानच्या माध्यमातून करु शकता. एससी/एसटी/पीडब्लूडी/महिला उमेदवारांना अर्जाची फी माफ आहे.

तर मध्य रेल्वेत या नोकर भरतीच्या प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही आहे. मात्र 10 वी च्या गुणांच्या आधारावर योग्य उमेदवारांनी निवड केली जाणार आहे.