File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

RBI Office Attendant Recruitment 2021: भारतीय रिजर्व्ह बँकेत नोकरीची संधी उपलब्ध आहे. तर आरबीआय ने ऑफिस अटेंडेंटच्या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 841 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वक अर्जाची प्रक्रिया 24 फेब्रुवारी पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2021 आहे.

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10 वी असणे अनिवार्य आहे. तसेच 18 वर्ष ते 25 वयोगटातील उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. वर्षाची मोजणी 1 फेब्रुवारी 2021 नुसार केली जाणार आहे.(Capgemini Recruitment 2021: खुशखबर! यंदा दिग्गज आयटी कंपनी कॅपजेमिनी भारतामध्ये देणार 30,000 लोकांना नोकऱ्या)

उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशिएंन्सी टेस्ट (LPT) च्या माध्यमातून केली जाणार आहे. तर इच्छुक उमेदवारांना आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन लेखी परीक्षेत 120 MCQ प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. लेखी पेपरसाठी 30 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ऑनलाईन लिखित परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापले जाणार आहेत. परीक्षेच्या पॅटर्न संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.