BEd, M.Ed course duration Expanded | (BEd, M.Ed course duration Expanded)

BEd, M.Ed course duration Expanded: अध्यापक पदवी अभ्यासक्रम अर्थातच बीएड (BED)किंवा श्(BSC BED) आणि एमएड (MED)अभ्यासक्रम कालावधी आता वाढविण्यात आला आहे. हे तिन्ही अभ्यासक्रमक पूर्ण करणासाठी विद्यार्थ्यांना आता अनुक्रमे चार वर्षे आणि तीन (एमएड) वर्षे लागणाऱ आहेत. विशेष म्हणजे BED अभ्यासक्रमाला आता थेट इयत्ता 12 वी नंतर प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याविषयी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२०पासून नव्या नियमानुसार अभ्यासक्रमाची सुरुवात होईल.

अभ्यासक्रमात मुलभूत बदल

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार बीएड अभ्याक्रमात काही मुलभूत बदलही होणार आहेत. त्यामुळे बीएड अभ्यासक्रम आता 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' नावाने ओळखला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास तर दिला जाईलच. परंतू, त्यासोबत त्यांना अध्यापनाची विविध कौशल्ये आधुनिक पद्धतीनेही शिकवली जातील.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद आखणार नियमावली.

विद्यार्थ्यांना 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' पद्धती अंतर्गत अध्यापन कौशल्ये शिकविण्यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद एक नियमावली तयार करणार आहे. राष्ट्रीय अध्यापक परिषदेने ठरवून दिलेल्या नियमांना अधिक राहूनच 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' तयार केला जाणार आहे. (हेही वाचा, CBSE, CISCE बोर्ड दहावी व बारावी परीक्षा निकाल जाहीर,आता महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये MSBSHSE Result ची आतुरता)

'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' प्रवेश प्रक्रिया

दरम्यान, 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' प्रेवश प्रक्रिया सुरुही झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सध्यास्थितीत ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना सध्याच्या बीएड कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. ज्या विद्यापीठांतील नियमित कॉलेज तसेच, बीएड कॉलेज यांनी 'एकात्मिक बीएड अभ्यासक्रम' तयार केला आहे. त्यांना नियमित कॉलेज व वर्षे बीएड कॉलेज घेण्यास मुभा आहे. मात्र, ही मुभा केवळ पहिली आणि नंतरची अशी दोनच वर्षे आहे. त्यानंतर सर्वा कॉलेजना समान नियम लागतील. लक्षय्वेधी असे की, या पद्धतीत आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत तब्बल 3 वेळा बदल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार 2014 पर्यंत हा अभ्यासक्रम एक वर्षांचा होता. तोच अभ्यासक्रम 2015-16 मध्ये 2 व र्षे इतक्या कालावधीचा करण्यात आला.