CBSE, CISCE बोर्ड दहावी व बारावी परीक्षा निकाल जाहीर,आता महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये MSBSHSE Result ची आतुरता
SSC, HSC Exam (Photo Credits: Pixabay)

SSC and HSC Results 2019: आज देशामध्ये CISCE बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यापूर्वी CBSE बोर्डानेदेखील अनपेक्षितपणे विद्यार्थ्यांना निकालांचं सरप्राईज देत त्यांचे निकाल जाहीर केले. आता महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) विद्यार्थ्यांनाही त्यांच्या निकालाचे (Exam Results) वेध लागले आहेत. अद्याप महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र अपेक्षेप्रमाणे यंदा दहावी (SSC) आणि बारावीचे (HSC) निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

कधी लागणार MSBSHSE चे दहावी आणि बारावीचे निकाल ?

काही दिवसांपूर्वी पालकांनी बोर्डाकडे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाला यंदाच्या लोकसभा निवडणूकीमुळे उशिर होणार का? अशी विचारणा केली असता. मंडळाकडून यंदा शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळण्यात आलं आहे. तसेच मे 2019 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून 2019 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहावी, बारावीचे निकाल लागतील असे सांगण्यात आले आहे.

कुठे पहाल निकाल?

maharesults.nic.in, maharashtraeducation.com आणि results.mkcl.org या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

यंदा दहावीचे 17,00,813 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले आहेत.