फेब्रुवारी मध्ये 12 वी तर मार्चमध्ये 10 वी च्या परीक्षा पार पडल्या. परीक्षा झाल्यानंतर वेध लागतात ते निकालाचे. कारण निकालावरच पुढे कोणत्या शाखेला जायचं, कोणतं क्षेत्र निवडायचं, या गोष्टी ठरत असतात. तसंच अभ्यासक्रम, कॉलेज निवडीपासून अनेक प्रश्न समोर असतात. म्हणूनच कोणत्या बोर्डाचा उत्तीर्ण होण्याचा निकष कोणता आहे, जाणून घेऊया... मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता
CBSE:
CBSE बोर्डाने परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष कमी केले आहेत. बोर्डानुसार, पास होण्यासाठी कमीत कमी 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. यात विद्यार्थ्यांना इंटरनल आणि एक्सटर्नल असे वेगळे 33% मिळवण्याची गरज नाही. दोन्ही मिळून 33% मिळवण्यास तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. यंदा बोर्डाने 12 वी च्या परीक्षेसाठी गुणांचे निकष बदललेले नाही.
ISCE:
ISCE बोर्डाने देखील 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांसाठी उत्तीर्ण होण्याचा निकष कमी केला असून 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून तो लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी 35% ऐवजी 33% गुण मिळवावे लागतील. तर ISC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 40% ऐवजी 35% गुण मिळवणे अपरिहार्य ठरणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो 'दहावी'चा निकाल
महाराष्ट्र बोर्ड MSBSHSE:
SSC आणि HSC परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत कमीत कमी 20% गुण मिळवणे आणि एकूण (aggregate) 35% गुण मिळवणे अपरिहार्य आहे. पूर्वी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लेखी आणि तोंडी या दोन्ही परीक्षांमध्ये 35% गुण मिळवणे आवश्यक होते.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.