Maharashtra Board HSC Results 2019: मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता
Representational Image (Photo credits: PTI)

MAH HSC Board Results 2019 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालांची प्रतिक्षा आहे. इंजिनिअर्स पासून ते अगदी डिझाईनिंगच्या विविध कोर्सच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांच्या प्रवेशपरीक्षांसोबतच बारावीचे (HSC) मार्क्सदेखील महत्त्वाचे असतात. त्यानुसार कॉलेजपासून कोणत्या शाखेमध्ये प्रवेश मिळणार असे असंख्य प्रश्न उभे असतात. यंदा 20 मार्चला परीक्षा संपल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (HSC Results 2019) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय

साधारणपणे परीक्षा झाल्यानंतर 45-60 दिवसांमध्ये निकाल लागणं अपेक्षित असतं. यंदा परीक्षांचा काळ आणि महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका असल्याने त्याचा परिणाम दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर दिसण्याची शक्यता होती. मात्र शिक्षकांना मतदानाच्या कामातून वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षेनुसार वेळेत निकाल लागण्याची शक्यता आहे. SSC, HSC बोर्डाच्या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळले; परिपत्रकातून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मागील वर्षी बारावीचा निकाल 30 मे 2018 दिवशी लागला होता. त्यामुळे यंदादेखील बारावीचा निकाल मेचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा यादरम्यान लागण्याची शक्यता आहे. अद्याप शिक्षन मंडळाकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काही व्हायरल होणार्‍या चूकीच्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं टाळा.

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनच निकालाची तारीख आणि प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक जारी केलं जातं. शक्यतो निकालाची तारीख अवघे काही तास आधी जाहीर केली जाते.