प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

Maharashtra  State Board 10th Result: मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दहावीची (SSC) परीक्षा पार पडली. यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याचं हे शेवटचं वर्ष होतं. त्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेल्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आता निकाल कधी लागणार याचे वेध लागले आहेत. यंदा शिक्षकांना मतदानाच्या कामातून वगळण्यात आल्याने दहावीचे निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी प्रमाणे यंदादेखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल (SSC 2019 Result) लागू शकतो. मात्र अद्याप निकालाबाबातची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Maharashtra Board HSC Results 2019: मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य बोर्ड दहावी निकाल 2019

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरच दहावीचा निकाल जाहीर केला जाहीर केला जाईल. निकालापूर्वी काही दिवस आधी त्याची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल.

  • परीक्षा तारीख - 1 मार्च ते 22 मार्च 2019
  • दहावी निकाल अधिकृत संकेतस्थळ - mahresult.nic.in
  • अंदाजे निकालाची तारीख - मे 2019 चा अंतिम आठवडा ते जून महिन्याचा पहिला आठवडा.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाची तारीख, वेळ, प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती अधिकृत वेवसाईटवरूनच दिली जाईल. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काही तारखांबद्दल माहिती पसरवली जात असल्यास त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ एकदा नक्की तपासून पहा.