Bihar Shocker: बिहारच्या अररिया जिल्ह्यातील नगर पोलीस स्टेशन परिसरातून एका अमानवी कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही लोकांनी चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला ओलिस करून त्याचे हात बांधून त्याच्याशी क्रूर वर्तन केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. त्याचा प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून अमानुष कृत्य करण्यात आले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही लोकांनी तरुणाला पकडून ठेवले असून एक व्यक्ती त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरची टाकत आहे. एवढेच नाही तर तो त्याचा प्रायव्हेट पार्टमध्ये लाकडाचा एक छोटा तुकडाही घालत आहे. यादरम्यान काही लोक त्याला शिवीगाळही करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. हे देखील वाचा: Telangana Accident: भरधाव कारच्या धडकेत स्कूटरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू (Watch Video)
आरजेडीने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, "हे नितीश भाजपचे महागुंडराज-महाजंगलराज आहे! ते तालिबानपेक्षाही वाईट आहेत. मुख्यमंत्र्यांना अक्कल नाही. बिहारमध्ये दररोज शेकडो हत्या होत आहेत."
व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याची सत्यता पुष्टी झाली. अररिया नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी मनीष रजक यांनी मंगळवारी आयएएनएसला सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झाली. हा संपूर्ण प्रकार अररिया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉस्पिटल चौकात घडला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सफात मियाजी असे आरोपीचे नाव असून तो इस्लाम नगर येथील राहणारा आहे. त्यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर लोकांची ओळख पटवली जात असून त्यांच्या अटकेसाठी छापे टाकण्यात आले आहेत.