Telangana Accident: तेलंगणातील मेडचाल येथे सोमवारी भीषण अपघात घडला आहे. रात्रीच्या वेळीस रस्ता ओलांडताना भरधाव कारने एका स्कूटरला धडक दिली. या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यूा झाला तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह ११ जण जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, मेडचाल येथील मुराहगीर पल्ली चौकातील रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. रस्ता ओलांडताना हैद्राबादहून करीनमनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने स्कूटीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटीवरून दोघे जण काही अंतरावर उडाले. या धडकेत एकाचा मृत्यू झाला. पंकज राम असं मृताचे नाव आहे. ते बिहार येथील रहिवासी आहे. तर अपघातात त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले. पूजा कुमार असं तिचं नाव आहे. तिच्यावर आरव्हीएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
अपघाताचा व्हिडिओ
సీసీ ఫుటేజ్.. ఘోర రోడ్డు ప్రమాదం
మేడ్చల్ పరిధిలోని యాడారంలో బైక్ పై తండ్రి, కూతురు యు టర్న్ తీసుకుంటుండగా వేగంగా వచ్చి వెనుక నుండి ఢీ కొట్టిన కారు
తండ్రి, కూతురు పరిస్థితి విషమం pic.twitter.com/Z8Pq4wL2yy
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 27, 2024
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेसंदर्भात सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाला ताब्यात घेतेल आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.