पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department) जारी केलेले पॅनकार्डची (PAN Card) अनेक महत्वाच्या ठिकाणी वापर केला जातो. पॅनकार्डला महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते आहे. ज्या लोकांजवळ पॅनकार्ड नाही, अशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पॅनकार्ड बनवणे अतिशय गरजेचे असते. परंतु पॅनकार्डसाठी अर्ज करण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडून जातो. पॅनकार्डसाठी अर्ज करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

जर तुमच्याकडे अद्यापही पॅन नंबर अर्थात पॅनकार्ड नसेल आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर काही सोप्या सूचनांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. अर्जदाराने सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindia.gov भेट द्या. दरम्यान, काही अर्जदार फॉर्म 49 ए भरत असताना अनेक चुका करतात. यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पॅनकार्डसाठी केलेल्या अर्ज रद्द होऊ शकतो. हे देखील वाचा- PAN-Aadhaar Link: पॅनकार्ड आधारला जोडण्याच्या मुदतीत वाढ

 

पॅनकार्डसाठी अर्ज करताना अशी घ्या काळजी

 

1) जर तुमच्याकडे आधी एक पॅन कार्ड असेल तर दुसऱ्यासाठी अजिबात अर्ज करू नका. दोन पॅन कार्ड बाळगणे गुन्हा आहे.

2) वडिलांचे नाव लिहिण्याच्या ठिकाणी पती किंवा पत्नीचे नाव लिहू नका.

3) सहीसाठी दिलेल्या चौकटीत तारीख, पद, रँक यांसारखी अनावश्यक माहिती देऊ नका.

4)अर्ज भरताना अर्जदाराच्या नावावर नसलेले ओळखपत्र किंवा घराचा पत्ता लिहू नये.

5) आपण नाव आणि आद्याक्षरांचा संक्षेप वापर टाळावा.

6)हा फॉर्म भरताना तुमची स्वाक्षरी चौकटीच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या.

7) फॉर्म 49A मध्ये पत्ता लिहिताना पिन कोड चुकीचा लिहू नका. पिन कोडसोबतच फोन नंबर किंवा ई-मेल आयडी अचूक लिहावे.

8) फॉर्म 49A भरताना खाडाखोड करु नये.

9) फॉर्मवर तुमचा फोटो चिकटवलेला चालेल पण त्यासाठी पिन किंवा स्टेपलरचा वापर करु नका.

जर तुमच्याजवळ पॅनकार्ड नसेल तर आपल्याला कोणत्याही बॅंकेत खाते उघडता येणार आहे. याशिवाय, बॅंक किंवा अर्थिक संस्थात डेबीट कार्ड किंवा क्रेडीट अर्ज करण्यासाठी तुम्हाला पॅनकार्डची गरज भासते.