फरीदाबाद पोलिसांच्या (Faridabad Police) गुन्हे शाखेने एका व्यक्तीला बँक (Bank) लुटल्याप्रकरणी अटक (Arrested) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने त्याला कर्ज (Loan) देण्यास नकार दिला होता. याचा राग येऊन त्या व्यक्तीने बँकेत घुसून स्ट्राँग रूम तोडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी त्याने बँक मॅनेजरचा फोनही चोरला होता. फरीदाबादच्या धौज (Dhauj) येथील सर्व हरियाणा ग्रामीण बँकेत (Haryana Grameen Bank) गेल्या आठवड्यात ही बाब उघडकीस आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रॉबिन असे असून तो फरीदाबादमधील सेलखारी (Selkhari) गावचा रहिवासी आहे.
बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 18 जानेवारी रोजी बँकेत पोहोचलो तेव्हा एंट्री गेटचे रेलिंग आणि रॉड कापलेले होते. यासोबतच बँकेची अनेक कागदपत्रे इकडे-तिकडे फेकलेली आढळून आली. बँकेचीही तोडफोड करण्यात आली. बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने तक्रारीत म्हटले आहे की, 'स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या अल्मिराची तोडफोड करून कर्जाशी संबंधित कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली. हेही वाचा WFI Chief vs Wrestlers: ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंविरोधात दाखल केली याचिका; विनेश फोगाट, बजरंग पूनियासह अनेक खेळांडूवर केले आरोप
माझ्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेला माझा मोबाईलही चोरीला गेला आहे. व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून, फरीदाबाद पोलिसांनी धौज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 380 (घरातील चोरी) आणि 457 (खाजगी जागेवर अतिक्रमण) नुसार गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.
फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते सुबे सिंह म्हणाले, प्राथमिक तपासात असे आढळून आले की आरोपीला पैशांची नितांत गरज होती आणि घटनेच्या तीन-चार दिवस आधी तो कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेत गेला होता. योग्य कागदपत्रांअभावी बँकेने त्याचा कर्ज अर्ज फेटाळला. त्यामुळेच त्याने बँक लुटण्याचा कट रचला. पोलिसांनी सांगितले की , आरोपी बँक बंद होण्याची वाट पाहत होते. बँकेतून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7.15 ते रात्री 10.00 च्या दरम्यान बँकेत घुसले.