Photo Credit - Pixabay

Madras HC on PoSH: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित एका प्रकरणात, मद्रास उच्च न्यायालयाने (Madras HC)आपल्या निकालात म्हटले आहे की हेतू काहीही असो, कृती अधिक महत्त्वाची असते. एका प्रसिद्ध टेक कंपनीचा वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात कार्यालयात काम करणाऱ्या 3 महिलांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा (PoSH)आरोप असे त्याला म्हटले जाऊ शकते. अंतर्गत तक्रार समिती (ICC)सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. 'वरिष्ठ अधिकारी हा काम करताना महिलांवर लक्ष ठेवत असे आणि त्यांच्या मागे उभे राहत असे. त्या करत असलेले काम पाहत असे, तसचे स्पर्श करत असे, त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अहसज वाटते असे महला कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे.'

लैंगिक छळाशी संबंध

हे प्रकरण कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाशी संबंधित आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या तीन महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एका वरिष्ठावर अनुचित वर्तनाचा आरोप केला होता. महिलांनी अंतर्गत तक्रार समिती (ICC) मध्ये वरिष्ठांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांचा आरोप असा होता की 'त्या काम करत असताना वरिष्ठ त्यांच्या मागे खूप जवळ उभे असतात. त्यांच्या खांद्यांना स्पर्श करतात आणि हस्तांदोलन करण्याचा आग्रह करतात.'

वरिष्ठ अधिकाऱ्याचा बचावात युक्तिवाद

महिला कर्मचाऱ्यांच्या आरोपांवर वरिष्ठाने आपल्या बचावात युक्तिवाद केला की, 'महिलांना अस्वस्थ करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. ते फक्त त्यांच्या कामावर देखरेख करण्यासाठी त्यांच्या मागे उभा राहायचे. त्यांना त्रास न देता त्यांच्या कामावर लक्ष ठेवणे आहे हा त्यांचा हेतू आहे. ते फक्त त्याचे कर्तव्य करत होते.' आयसीसीने त्यांना दोषी ठरवले मात्र, कामगार न्यायालयाने तो निर्णय बदलला.

अवांछित वर्तन म्हणजे लैंगिक छळ

त्यानंतर हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाने कामगार न्यायालयाचा निर्णय रद्द केला. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची व्याख्या अधिक स्पष्ट आणि मजबूत झाली. न्यायालयाने म्हटले की, 'हेतू' पेक्षा 'कृती' जास्त महत्त्वाची आहे. न्यायमूर्ती आर एन मंजुळा म्हणाल्या की, छळ करणाऱ्याचा हेतू काहीही असो, कामाच्या ठिकाणी कोणाकडूनही होणारे कोणतेही अवांछित वर्तन लैंगिक छळ आहे.

अमेरिकेतील एका न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 'जर एखादी गोष्ट चांगली वाटत नसेल, अनुचित असेल आणि ती अवांछित वर्तनासारखी दिसत असेल जी दुसऱ्यांवर, म्हणजेच महिलांवर परिणाम करते, तर ती लैंगिक छळ आहे यात शंका नाही."

न्यायमूर्ती मंजुळा म्हणाल्या की, PoSH (लैंगिक छळ प्रतिबंधक) कायद्यानुसार, लैंगिक छळाची व्याख्या हेतूपेक्षा कृतीला जास्त महत्त्व देते. "ही मूलभूत शिस्त आणि समज आहे. ज्याद्वारे वेगळ्या लिंगांच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याची अपेक्षा केली जाते. जिथे सभ्यता हा आदर्श आहे आणि दुसरे काहीही नाही."