Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

केरळमध्ये (Kerala) मंकीपॉक्सचा (Monkeypox) आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की संक्रमित व्यक्ती 16 जुलै रोजी यूएईमधून मलप्पुरमला (Malappuram) आली होती. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे दिसू लागली. सध्या रुग्णाचे कुटुंबीय आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवरही नजर ठेवण्यात येत आहे. या प्रकरणासह राज्यात आतापर्यंत तिसरा रुग्ण आढळून आला आहे. भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 14 जुलै रोजी नोंदवला गेला.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून परतलेल्या 35 वर्षीय पुरुषाला मंकीपॉक्स असल्याची पुष्टी झाली. यानंतर एक उच्चस्तरीय केंद्रीय पथक केरळला पाठवण्यात आले. या पथकाला आरोग्यविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. केरळ सरकारने तातडीने पावले उचलत 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला होता. यासोबतच राज्यातील चारही विमानतळांवर हेल्प डेस्क तयार करण्यात आले आहेत.

परंतु 13 जुलै रोजी दुबईहून कन्नूर येथे आलेल्या 31 वर्षीय व्यक्तीमध्ये मांकीपॉक्स संसर्गाची दुसरी घटना नोंदवली गेली, ज्याची 18 जुलै रोजी पुष्टी झाली. ते एकमेकांच्या श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरते.  तथापि, हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा दुसरी व्यक्ती संक्रमित रुग्णाच्या खूप दिवसांपासून जवळच्या संपर्कात असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मंकीपॉक्सचा विषाणू रुग्णाच्या शरीरातील द्रव किंवा जखमांशी थेट संपर्क साधून पसरतो.

रुग्णाने वापरलेल्या कपड्यांमधूनही त्याचा प्रसार होतो. तथापि, मंकीपॉक्स हा विशेषत: झुनोसिस आहे, म्हणजे संक्रमित प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा रोग. आफ्रिकेत या रोगाचा प्रसार होण्याचे हे कारण होते, परंतु भारतात अशा प्रकारे मंकीपॉक्स पसरण्याची शक्यता खूपच कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सचा संसर्ग प्राण्यांपासून माणसात फक्त चावण्याने, ओरखड्याने किंवा वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याने पसरतो. यामध्ये उंदीर, गिलहरी, माकड यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे.