भारतातील ५६ टक्के आजार हे दुषित आहारामुळे, ICMR अभ्यासात मोठा खुलासा, मार्गदर्शक तत्त्वे जारी
FOOD | Representational image (Photo Credits: pxhere)

56 Percent Diseases in India are Due To Unhealthy Diet: भारतातील ५६.४ टक्के आजार हे दुषित आहारामुळे होतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) बुधवारी सांगितले की, भारतातील ५६.४ टक्के आजार हे अस्वास्थ्यकर आहाराच्या सेवनामुळे होतात. ICMR ने आवश्यक पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे आजार टाळण्यासाठी 17 प्रकारच्या आहारासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ICMR अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने सांगितले की, पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्यास हृदयाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि मधुमेह देखील टाळता येतो. “आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करून अकाली मृत्यू टाळता येऊ शकतो,” असे त्यात म्हटले आहे.

निरोगी जीवनशैलीमुळे चांगले आरोग्य मिळेल तसेच कमी मीठ, खाण्याचा तेल आणि चरबीचा कमी प्रमाणात वापर, साखर आणि जंक फूड खाणे टाळावे . लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून पौष्टिकतेने युक्त अन्न सेवन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने म्हटले आहे की निरोगी आहार आणि शारीरिक क्रियाकलाप कोरोनरी हृदयरोग (CHD) आणि उच्च रक्तदाब (HTN) चे लक्षणीय प्रमाण कमी करू शकतात आणि टाइप 2 मधुमेह 80 टक्क्यांपर्यंत रोखू शकतात.

निरोगी जीवनशैलीमुळे चांगले आरोग्य मिळेल NIN कमी मीठ खाण्याचा, तेल आणि चरबीचा कमी प्रमाणात वापर, योग्य व्यायाम, कमी साखर आणि जंक फूड खाण्याचा आग्रह करतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून पौष्टिकतेने युक्त अन्न सेवन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने म्हटले आहे की निरोगी आहार आणि शारीरिक क्रियाकलाप कोरोनरी हृदयरोग (CHD) आणि उच्च रक्तदाब (HTN) चे लक्षणीय प्रमाण कमी करू शकतात आणि टाइप 2 मधुमेह 80 टक्क्यांपर्यंत रोखू शकतात.

मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, संतुलित आहारामध्ये तृणधान्ये आणि बाजरी यांच्या 45 टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरीज असू नयेत. त्याचप्रमाणे, त्यात कडधान्ये, बीन्स आणि मांसामधून 15 टक्के कॅलरीज असणे आवश्यक आहे. उरलेल्या कॅलरीज मिळविण्यासाठी सुका मेवा, भाज्या, फळे, दूध यांचे सेवन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.