Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
11 minutes ago

पाकिस्तानने दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेण्याची भारताची मागणी ; 4 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Ashwjeet Jagtap | Feb 05, 2021 12:10 AM IST
A+
A-
05 Feb, 00:07 (IST)

पाकिस्तानने दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घ्यावी असे भारत सरकारने म्हटले आहे. सर्व दिशेने शांततेचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे. या पाक लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या टिप्पणीनंतर भारताने असे म्हटले आहे.

04 Feb, 23:30 (IST)

झारखंड मध्ये आज कोरोनाचे 58 नवे रुग्ण; 64 जणांची कोरोनावर मात

एकूण रुग्णसंख्या: 1,18,897

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,17,373

मृतांचा आकडा: 1077

सक्रीय रुग्ण: 447

04 Feb, 23:00 (IST)

शेतकरी तेथे शांततापूर्वक बसून आहेत. जर त्यांनी शांततेचा मार्ग इतर कोणत्याही मार्गासाठी सोडला तर देशाला एक मोठी समस्या भेडसावेल आणि त्याची जबाबदारी भाजपा सरकारला घ्यावी लागेल. यासारख्या अनेक समस्या आहेत. सत्तेत असलेले लोक असंवेदनशील आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

04 Feb, 22:42 (IST)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली आहे.

04 Feb, 21:35 (IST)

हिमाचल प्रदेशमध्ये आज दिवसभरात 16 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून एकूण 56,268 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

04 Feb, 21:08 (IST)

लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

04 Feb, 20:57 (IST)

मुंबईत आज दिवसभरात 463 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,10,597 इतकी झाली आहे.

04 Feb, 20:33 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 2736 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,36,002 पोहोचली असून मृतांचा आकडा 51,215 वर पोहोचली आहे.

04 Feb, 20:11 (IST)

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या 83 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

04 Feb, 19:59 (IST)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बंगळूरु येथे आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा उपस्थित होते.

Load More

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. रिहानाचे हे ट्विट बरेच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021-22 या आर्थिक वर्षांचा 2945.78 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 1 कोटी 29 लाखांची वाढ झाली आहे. दरम्यान, पालिकेचे उत्पन्न कमी झालेले असले तरी विकासकामे आणि प्रकल्पांसाठी के ल्या जाणाऱ्या भांडवली तरतुदीत मात्र यंदा भरघोस वाढ करण्यात आली आहे. पुढील वर्षी फे ब्रुवारी 2022 मध्ये पालिके च्या निवडणुका होणार असल्यामुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे. मुंडेंविरुद्ध दुसऱ्या पत्नीने मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. तसेच यामध्ये एक 14 वर्षांची मुलगी असून मुले सुरक्षित नसल्याचे देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

पुण्यातील एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानी याला कुठेही असला तरी शोधून अटक करु, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर असून बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसंच त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.


Show Full Article Share Now