इटली मध्ये Coronavirus चा हाहाकार, आतापर्यंत 155 जणांना कोरोनाची लागण ; 23 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र
Ashwjeet Jagtap
|
Feb 23, 2020 11:03 PM IST
दिल्लीतील न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामध्ये चार दोषींपैकी एक विनय कुमार शर्माची याचिका खारिज केली आहे. या याचिकेमध्ये त्याने दावा केला होता की, विनय कुमार मानसिकरित्या आजारी असून त्याला उपचाराची गरज आहे.' अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दोषी विनय कुमार शर्मा यांनी ही याचिका फेटाळली आहे.
उद्धव ठाकरे यां नी दिल्ली दौऱ्यादरम्यान सीएए आणि एनआरपीला समर्थन असल्याचे स्पष्ट केल्यानंतर ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर महाविकास आघाडीतली धुसफूस समोर आली असून याची दखल आता शरद पवारांनी घेतली आहे. कारण वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात सीएए आणि एनपीआरवर चर्चा झाली. या कायद्यासंदर्भात तिन्ही पक्षातील नेते आढावा घेणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. कायद्यात ज्या बाबींवर आक्षेप आहे. त्या केंद्राला कळवण्यात येणार आहे. तसेच 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त आणि अडचणीचे विषय टाळण्यावर एकमत झालं आहे.
भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज 23 फेब्रुवारी रोजी भारत बंद ची हाक दिली आहे. राज्य सरकारी नोकरीत जातीय आरक्षण देणे तसेच नोकरीमध्ये बढतीच्या वेळी आरक्षणाचे फायदे देणे रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यांनतर आझाद यांच्याकडून देशव्यापी बंदाची हाक देण्यात आली आहे
अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या दोन माजी आमदारांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे. तसेच राज्यभरातील 48 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. पक्षावरचा विश्वास संपल्यामुळे राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. राजीनामा देण्याऱ्या माजी आमदारांमध्ये हरिदास भदे आणि बळीराम सिरस्करांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे आणि त्याचे मार्गक्रमण योग्य मार्गाने सुरू असल्याचंही म्हटले आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती नाही, असेही स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या समर्थनात आज अकोले बंद पुकारण्यात आला आहे. भूमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. देसाई यांनी इंदोरीकरांना काळे फासण्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला. सम-विषमच्या वादानंतर इंदुरीकरांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही देसाईंनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने अकोलेकर संतप्त झाले आहेत. इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचेआयोजन करण्यात आले आहे.