Delhi Horror: दक्षिण दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात झाल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री रोहिणी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी पीसीआरवर कॉल आला आणि शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याची माहिती देण्यात आल्यचे पोलिसांनी संगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित धर्मेंद्र याचा शेजारी पियुष तिवारी (२१) आणि कपिल तिवारी (२६) यांच्याशी मोठ्या आवाजाच्या संगीताच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. धर्मेंद्र आणि त्याच्या भावाने मोठ्या आवाजाला आक्षेप घेतल्याने आरोपी भावांशी वाद झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हे देखील वाचा: New Delhi: संभलच्या शाही जामा मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे, सर्वेक्षण अहवालात मोठा खुलासा
या वादाला हिंसक वळण लागलं आणि आरोपींनी धर्मेंद्र आणि त्याच्या भावाला मारहाण केली. धर्मेंद्र यांना बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. धर्मेंद्र यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.