Kia Syros Unveiled in India: दक्षिण कोरियन Hyundai ची सिस्टर कंपनी Kia Motors ने अखेर आज भारतात आपली नवीन सब-4-मीटर कॉम्पॅक्ट SUV Syros लाँच केली आहे. ही 7-सीटर SUV आहे आणि Sonet पेक्षा थोडी मोठी आहे, ज्यामध्ये Seltos पेक्षा जास्त जागा आहे. या एसयूव्हीमध्ये बॉक्सी डिझाइन आहे, ज्यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल-स्क्रीन सेटअप, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले याशिवाय अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत.
कंपनीने याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील वर्षी जानेवारी 2025 पासून त्याची बुकिंग सुरू होईल आणि त्यासोबतच किंमतही समोर येईल. फेब्रुवारी महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.
सुरक्षा व प्रकार-
भारतातील सब-4 मीटर सेगमेंटमधील ही पहिली कार आहे, ज्याच्या सर्व सीट हवेशीर आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहेत. सुरक्षेसाठी, लेव्हल-2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टीम (ADAS) आणि 6 एअरबॅग्ज सारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. ही गाडी 6 प्रकारात सादर करण्यात आला आहे. यामध्ये HTK, HTK (O), HTK+, HTX, HTX+ आणि HTX+ (O) समाविष्ट आहे.
इंजिन-
या गाडीमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 120hp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स (MT) आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (DCT) च्या पर्यायासह उपलब्ध असेल.
त्याच वेळी, आणखी 1.5 लिटर डिझेल इंजिन उपलब्ध असेल, जे 116hp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, ते 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स (MT) आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (AT) च्या पर्यायासह उपलब्ध असेल.
इतर फीचर्स-
सायरोसला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी ओटीए अपडेट, इन-कार कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी, चारही हवेशीर सीट्स, सेंटर आर्मरेस्ट, 60:40 स्प्लिट-फोल्डिंग फंक्शन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, , 8-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम, ड्युअल-पेन पॅनोरमिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, रियर पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS सूट सारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.