IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, भारताची आघाडीची फळी पुन्हा अपयशी; धावसंख्या तीन विकेट्सवर 50 धावा पार

सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने कर्णधारपद हाती घेतले आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताची टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आहे. आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, भारताची आघाडीची फळी पुन्हा अपयशी; धावसंख्या तीन विकेट्सवर 50 धावा पार
KL Rahul And Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने कर्णधारपद हाती घेतले आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताची टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आहे. आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. लंच ब्रेक आधी शुभमन गिलची विकेट मिळाली. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात तीन विकेट गमावून 57 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2025 08:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).