IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Full Highlights: सिडनी कसोटी रोमांचक वळणावर, भारताने घेतली 145 धावांची आघाडी; येथे पाहा दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण हायलाइट्स एका क्लिकवर

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा (8) तर सुंदर (6) धावांंवर नाबाद आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Full Highlights: सिडनी कसोटी रोमांचक वळणावर, भारताने घेतली 145 धावांची आघाडी; येथे पाहा दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण हायलाइट्स एका क्लिकवर
IND vs AUS (Photo Credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा (8) तर सुंदर (6) धावांंवर नाबाद आहे. तत्पूर्वी, भारताच्या 185 धावांसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 181 धावांत सर्वबाद झाला होता. तिसऱ्या दिवशी 200 धावसंख्या गाठण्यासाठी भारताचे लक्ष असेल. गेल्या 25 वर्षांत, 200+ च्या लक्ष्याचा पाठलाग सिडनीमध्ये फक्त एकदाच केला गेला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2025 03:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).