Reliance NU launched: अनिल अंबानींच्या (Anil Ambani)रिलायन्स पॉवर लिमिटेडने नवीन अक्षय ऊर्जा कंपनीची स्थापना केली आहे. रिलायन्स एनयू एनर्जी प्रायव्हेट(Reliance NU Energies) लिमिटेड स्थापन करण्याची केली आहे. ही कंपनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली क्षेत्रात काम करेल. विशेष बाब म्हणजे रिलायन्स पॉवर(Reliance Power) लिमिटेडने या कंपनीत दोन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मयंक बन्सल यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि राकेश स्वरूप यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) बनवण्यात आले आहे. (Indian Stock Markets Consolidation: भारतीय शेअर बाजाराची सावध सुरुवात; गुंतवणुकदारांचे CPI डेटावर लक्ष)
रिलायन्स पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी अक्षय ऊर्जा व्यवसायासाठी रिलायन्स एनयू एनर्जीज नावाची नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. जगभरात, अक्षय ऊर्जेची मागणी वाढत आहे. हे लक्षात ठेऊन कंपनीची स्थापना करण्यात आल्याचे रिलायन्स पॉवरकडून सांगण्यात आले आहे.
रिलायन्स पॉवर, अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाचा भाग, वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. मध्य प्रदेशमध्ये 4,000 मेगावॅट अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प आहे. हा जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील एक म्हणून त्याची गणना केली जाते. आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक केलेल्या बन्सल यांनी यापूर्वी रिन्यू पॉवर इंडिया ग्रूपचे चेअरमन म्हणून काम केले आहे. त्यांना या क्षेत्रात 17 वर्षाहून जास्त अनुभव आहे. (हेही वाचा: )
रिलायन्सच्या नव्या कंपनीच्या स्थापनेनंतर सोमवारी आर पावरचे शेअर चांगले वाढले होते. रिलायन्स पॉवरचा शेअर 45.30 रुपयांवर पोहोचला होत. त्यानंतर मंगळवारी शेअर काही प्रमाणावर घसरला. 31 पैशांच्या घसरणीनंर शेअर 44.66 रूपयांवर बंद झाला.