लंडन (Photo Credit : Pixabay)

इंग्रजांनी भारतावर 150 हून अधिक वर्षे राज्य केले. या काळात त्यांनी भारतीयांचे अनेक प्रकारे शोषण केले. यासह भारतामधील मोठ्या प्रमाणात मालमत्ताही लुटली गेली. आता लंडनस्थित एका प्रॉपर्टी डेव्हलपरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, लंडनमधील सर्वात जास्त मालमत्तेचे (Property) मालक आता भारतीय आहेत. बॅरेट लंडनने (Barratt London) हा अहवाल प्रसिद्ध केला असून, ज्यामध्ये लंडनमधील भारतीय मालमत्ता खरेदीदारांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.

यामध्ये पिढ्यानपिढ्या ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे रहिवासी, एनआयआय, परदेशी गुंतवणूकदार आणि शिक्षणासाठी स्थलांतरित लोकांचा समावेश आहे. आता ब्रिक्स न्यूजच्या अधिकृत X हँडलवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत, लंडनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक हळूहळू शहरातील मालमत्ता वाढवत असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

बॅरेट लंडनने सुमारे दोन वर्षापूर्वी लंडनच्या रिअल इस्टेटबाबत अहवाल तयार केला होता. ब्रिटनची राजधानी लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांनी दबदबा निर्माण केल्याचे अहवालात प्रथमच समोर आले. बॅरेट लंडनच्या मते, लंडनमधील रिअल इस्टेटच्या बाबतीत भारतीयांनी ब्रिटीशांना मागे टाकले आहे आणि मालमत्तेच्या मालकीच्या बाबतीत ते पहिल्या स्थानावर आहेत. (हेही वाचा: यंदा होणार World War III? लंडनच्या निकोलस औजुलाने केली 2025 साठी तिसरे महायुद्ध, ब्रिटीश साम्राज्याच्या पतनासह अनेक भाकिते)

Indians Own More Property in London-

महत्वाचे म्हणजे अपार्टमेंट आणि घरे खरेदीसाठी भारतीय लंडनमध्ये 3 ते 4.7 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, भारतीयांनंतर मालमत्ताधारकांचा सर्वात मोठा गट ब्रिटिश आणि नंतर पाकिस्तानी लोकांचा नंबर लागतो. बॅरेट लंडनच्या अहवालातून असे दिसून आले आहे की, ब्रिटीश राजधानीत अशा अनेक भारतीयांच्या मालमत्ता आहेत, जे अनेक पिढ्यांपासून लंडनमध्ये राहत आहेत. या भारतीयांकडे सर्वाधिक मालमत्ता आहे. त्यानंतर नोंदणीकृत नसलेले भारतीय, ब्रिटनच्या बाहेर राहणारे गुंतवणूकदार आणि अभ्यासासाठी ब्रिटनमध्ये आलेले विद्यार्थी आहेत. हा रिपोर्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी विनोदी प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.