कोणत्याही चर्चेतील मतभेद मुद्द्यांवरुन गुद्द्यावर आले की, हिंसा (Women Violence) झालीच म्हणून समजा. मग हे मतभेद कितीही किरकोळ असले तरीसुद्धा. याचीच प्रचिती अमरावती Amravati) जिल्ह्यातील मोर्शी बसस्थानक (Bus Stand-Morshi) परिसरात अनेकांना प्रत्यक्ष पाहायाला मिळाली. ज्यांना ती प्रत्यक्ष पाहायला मिळाली नाही त्यांनी ती सोशल मीडिया मंचावरुन व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओद्वारे (Amravati Women Beating Video) पाहिली. या ठिकाणी चार तरुणींमध्ये अगदी काही किरकोळ कारणांवरुन मतभेद झाले. त्याची परिणीती इतक्या मोठ्या भांडणात झाली की, या चौघींही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या आणि त्यांनी थेट हाणामारी केली. एकमेकींना जमीनीवर पाडले आणि परस्परांच्या झिंज्याही उपटल्या. ही घटना सोशल मीडियावर व्हिडिओच्या रुपात व्हायरल झाली आहे.
मोर्शी बसस्थानक परिसरात महिलांची हाणामारी
अमरावती जिल्ह्यात असलेल्या मोर्शी बसस्थानक परिसरात तरुणींमध्ये झालेली हाणामारी नेमकी कोणत्या कारणास्तव झाली याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र, अनेकांसाठी तो टीका आणि उत्सुकता आणि कुतुहलाचा विषय नक्कीच ठरली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे की, बसस्थानक परिसरात सुरुवातीला दोन तरुणी एकमेकींशी भांडत आहे. त्यांच्यात बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकींवर हल्ला चढवला आहे. हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. त्यात आणखी एक निळ्या लुगड्यातील महिला येते. ही महिलासुद्धा या भांडणात आपला सहभाग नोंदवते. ती इतकी सक्रीय होते की, तिला त्या दोन्ही मुली धरुन हाणमार करु लागतात. इतक्यात चौथी तरुणी तेथे येते आणि मग सुरु होते फ्री स्टाईल हाणामारी. कोणासही कोणताही संकोच नाही. दे दणादण कार्यक्रम. (हेही वाचा, Women Thrashing Each Other at Nashik Toll Plaza: पैसे भरण्यावरुन वाद; CRPF जवानाची पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, Video Vira)
महिला भांडण्यात मग्न, बघे व्हिडिओ काढण्यात दंग
धक्कादायक असे की, महिलांची हाणामारी सुरु असताना तिथे बघ्यांची मोठी गर्दी होते. गर्दीतील चारदोन लोक नाही म्हणायला भांडणे सोडविण्यासाठी प्रयत्न करु पाहतात. पण भांडणे सोडविणाऱ्यांपैकी बघ्यांची गर्दी अधिक आणि त्यातही जवळपास प्रत्येकालाच हा क्षण आपल्या स्मार्टफोनमध्ये कैद करायचा होता. अनेक जण मोबाईल घेऊन सरसावतात. त्यांनी या महिलांचा हा सर्व धिंगाणा आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केलासुद्धा. या भांडखोर महिलांनाही सार्वजनिक ठिकाणी आपणाकडून होणारे वर्तन कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्याने टिपते आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ शकतो, याचे कसलेच भान नव्हते. त्या अगदी दंग होऊन भांडत होत्या. जसे की, एखादा खेळाचा सामनाच सुरु आहे आणि विजेताला काहीतरी मोठे बक्षीसच मिळणार आहे. (हेही वाचा, Women Fight For Bus Seat: अशी हाणामारी तुम्ही कधीच पाहिली नसेल! बसच्या सीटसाठी महिलांमध्ये वाद, धक्काबुक्की आणि केस ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल)
सार्वजनिक ठिकाणी मारहाण करताना महिला
View this post on Instagram
दरम्यान, महिलांमध्ये सुरु असलेले हे भांडण केव्हा संपले. त्यांच्यात समेट घडला किंवा नाही. तसेच, कोणाविरुद्ध पोलीस तक्रार झाली आहे का, पोलिसांनी स्वत: या घटनेची दखल घेतली आहे का? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओखाली अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटले आहे की, 'करा यांना आणखी आर्धे तिकीट', दुसऱ्याने म्हटले आहे,'आता हेच केवळ पाहणे बाकी होते'. अनेकांनी वेगवेगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, भांडण नेमके कशामुळे लागले हे समजू शकले नाही.