Balika Diwas 25 | File Image

सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात 3 जानेवारी हा दिवस बालिका दिवस (Balika Diwas) म्हणून साजरा केला जातो. 1955 पासून सावित्रीबाई फुलेंच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या भारतामधील पहिल्या शिक्षिका आहेत. त्यांनी समजाचा रोष पत्करून मुली आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. आज त्यांच्यामुळे अनेक स्त्रियांचं विश्व हे चूल आणि मूल केवळ इतकच मर्यादित न राहता जगाला गवसणी घालण्या इतपत व्यापक झालं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सावित्रीबाईंना अभिवादन करत मुलीचा जन्म सेलिब्रेट करायला विसरू नका. आज बालिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, WhatsApp Status, Wishes, Greetings, Photos, HD Images नक्की शेअर करा.

महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा 3 जानेवारी हा दिवस साजरा होतो. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती जोतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. सावित्रीबाईंनी पती कडून घेतलेल्या शिक्षणाचा पुढे त्यांनी ज्ञानदान करत वसा चालवला.

बालिका दिवसाच्या शुभेच्छा

Balika Diwas 25 | File Image

Balika Diwas 25 | File Image

महाराष्ट्रात 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा होतो तर राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी 2008 मध्ये याची सुरुवात केली होती.