Ladki Bahin Yojana Scrutiny: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) मधील लाभार्थी महिला त्यांना मिळणारे मानधन 1500 वरून 2100 कधी होणार? याची प्रतिक्षा करत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे. पण 5 गोष्टींच्या आधारे आता अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधून अपात्र होऊ शकतो. आज मंत्री आदिती तटकरे यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आदिती यांनी निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं म्हणाल्या आहेत.
कोण होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधून अपात्र?
- अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल
- चारचाकी असलेल्या महिला
- आंतरराज्य विवाह केलेल्या महिला
- आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास
- एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत
दरम्यान आदिती तटकरे यांनी माहिती देताना सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. असेही स्पष्ट केले आहे. तसेच अन्य योजनेचा फायदा घेणार्यांमध्ये 1500 पेक्षा कमी फायदा मिळणार्यांचा समावेश असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सरकारकडून आणण्यात आली. या योजनेवर राज्यात महायुतीच्या बाजूने मतदान देखील झाल्याचं सांगण्यात आले. महायुतीने त्यांच्या वचननामा मध्ये या मानधनामध्ये वाढ केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र वाढीव रक्कमेसह बहिणींना फायदा कधी मिळणार याची अद्याप सरकार कडून माहिती देण्यात आलेली नाही. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट .
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले आहेत. लाभार्थी बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी आता 1400 कोटी रुपयांची तरतूद झाल्याचं सांगण्यात आले आहे.