Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का लागला आहे. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. भारताचा स्कोर 76/4
5TH Test. WICKET! 31.3: Virat Kohli 17(69) ct Beau Webster b Scott Boland, India 72/4 https://t.co/cDVkwfEkKm #AUSvIND
— BCCI (@BCCI) January 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)