Bangladesh Violence Case: बांगलादेश हिंसाचार प्रकरणात (Bangladesh Violence Case) अटक करण्यात आलेले हिंदू नेता चिन्मय कृष्णदास (Chinmoy Krishna Das) याचा जामीन अर्ज चट्टोग्राम न्यायालयाने (Chattogram Court) फेटाळला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इस्कॉनचे माजी नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांची जामीन याचिका बांगलादेशच्या चट्टोग्राम न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. कडेकोट बंदोबस्तात झालेल्या सुनावणीनंतर चितगाव न्यायालयाने आज चिन्मय कृष्ण दास यांना जामीन नाकारला.
चिन्मय कृष्णा दास यांचा जामीन अर्ज फेटाळला -
मेट्रोपॉलिटन सरकारी वकील ॲडव्होकेट मोफिजुर हक भुईया यांच्या म्हणण्यानुसार, चटगावचे मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या सुमारे 30 मिनिटांच्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळला. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून उद्भवलेल्या राजद्रोहाच्या खटल्यात अधिवक्ता अपूर्व कुमार भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील कायदेशीर पथक चिन्मयचा बचाव करेल. (हेही वाचा -Nashik Violence: बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान नाशिकमध्ये दगडफेक; परिस्थिती आता नियंत्रणात, पोलीस बंदोबस्त तैनात)
डेली स्टारशी बोलताना वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही आईजीब ओक्य परिषदेच्या बॅनरखाली चितगावला आलो आहोत. आम्ही चिन्मयच्या जामिनासाठी कोर्टात याचिका करणार आहोत. मला चिन्मयकडून पॉवर ऑफ ॲटर्नी आधीच मिळाली आहे. मी सर्वोच्च न्यायालय आणि चितगाव बार असोसिएशन या दोन्हींचा सदस्य आहे, त्यामुळे खटला चालवण्यासाठी मला स्थानिक वकिलाच्या परवानगीची गरज नाही. (हेही वाचा: Bangladesh Crisis: बांगलादेशचे नवे प्रमुख Muhammad Yunus यांचा PM Narendra Modi यांना फोन; दिले हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन)
तथापी, कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधा रमण दास यांनी म्हटलं आहे की, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्याला माहित आहे की संपूर्ण जग हे पाहत होते. नवीन वर्षात चिन्मय प्रभू यांची सुटका होईल, अशी आशा सर्वांना होती, मात्र 42 दिवस उलटल्यानंतरही आज झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन फेटाळण्यात आला. बांगलादेश सरकारने त्यांना न्याय मिळेल याची खात्री करावी.
बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर फडकावला भगवा -
25 ऑक्टोबर रोजी चितगाव येथे बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा फडकवल्याचा आरोप असलेल्या चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने बांगलादेशात अशांतता निर्माण झाली. 25 नोव्हेंबर रोजी त्याच्या अटकेमुळे निदर्शने झाली, 27 नोव्हेंबर रोजी चितगाव न्यायालयाच्या इमारतीबाहेर त्याचे अनुयायी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी यांच्यात हिंसक संघर्ष झाला. परिणामी एका वकिलाचा मृत्यू झाला. अटकेनंतर परिस्थिती आणखी बिघडली. यानंतर दोन साधू, आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी यांना 29 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तथापी, दंगलखोरांनी अशांततेदरम्यान बांगलादेशातील इस्कॉन केंद्राची तोडफोड केल्याचा दावा संघटनेच्या उपाध्यक्ष राधा रमण यांनी केला.