Nashik Violence: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संपूर्ण हिंदू समाजाने शुक्रवारी (16 ऑगस्ट 2024) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंददरम्यान नाशिक आणि जळगावमध्ये दगडफेकीमुळे तणाव पसरला आहे. दोन्ही ठिकाणांहून अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप ठाकूर म्हणतात, ‘परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Bangladesh Crisis: बांगलादेशचे नवे प्रमुख Muhammad Yunus यांचा PM Narendra Modi यांना फोन; दिले हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन)
पहा पोस्ट-
Clashes between two groups were reported from our Bhadrakali Police Station area, earlier in the day today. Our alert teams had responded with speed to the situation on the ground, and brought it under control immediately.
We are in the process of registering cases and arresting…
— नाशिक शहर पोलीस - Nashik City Police (@nashikpolice) August 16, 2024
#WATCH | Maharashtra: Senior Police Inspector, Dilip Thakur says, "An atmosphere of tension had arisen. But there is peace now. Police forces have been deployed at places..." https://t.co/5j0RsbmI3n pic.twitter.com/UO0WhYtoXn
— ANI (@ANI) August 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)