Notebandi 2.0: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून वापरल्या जातील. RBI च्या या निर्णयाला नोटाबंदी 2.O असे म्हटले जात आहे. सामान्यतः लोकांना माहित आहे की, 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच नोटाबंदी केली. पण नोटाबंदी ही नवीन संज्ञा नाही. नोटाबंदीचा इतिहास जुना आहे.
आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच 1946 साली नोटाबंदी झाली. भारताचे व्हाईसरॉय सर आर्किबाल्ड वेव्हेल यांनी एक अध्यादेश काढला, ज्यानंतर 26 जानेवारीच्या मध्यरात्री 12 नंतर 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. (हेही वाचा - How To Exchange Rs 2000 Notes: जाणून घ्या 2000 च्या नोटा बँकेतून कशा बदलून घेऊ शकता, मर्यादा आणि अंतिम मुदतही)
1978 मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नोटाबंदी -
16 जानेवारी 1978 रोजी जनता पक्षाच्या सरकारने काळा पैसा संपवण्यासाठी 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते.
2016 ची नोटाबंदी -
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक देशाला संबोधित केले. जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'बंधू आणि भगिनींनो, आज रात्री 12 वाजल्यापासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कायदेशीर ठरणार नाहीत.' पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर देशात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जुन्या नोटा परत करण्यासाठी बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एटीएमबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे टीकेची झोड उठली होती.
RBI कायदा, 1934 च्या कलम 26(2) अंतर्गत, केंद्र सरकार, RBI च्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनुसार, भारतीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे, कोणतीही नोट कायदेशीर निविदा असल्याचे घोषित करू शकते.