Uttar Pradesh NEWS PC Twitter

Uttar Pradesh News:  आजकाल तरुणांमध्ये रिल बनवण्याचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहेरिल शुट करण्यासाठी अनेक तरुण मंडळी काहींना काही अॅडवेन्चर करत असतात. सोशल मीडियावर प्रसिध्द मिळवण्यासाठी व्हिडिओ (Video) बनवत असतात परंतु काही वेळा हीच गोष्ट अत्यंत वेदनादायक ठरू शकते. उत्तर प्रदेशाच्या बंदरा जिल्ह्यातील एका युवकाला रिल शुट करणं जीवाशी बेतले आहे. 17 वर्षाच्या शिवमनने रिलसाठी शाळेच्या छतावर लटकून व्यायाम केला. परंतु पुढे जे घडले ते धक्कादायक होते. (हेही वाचा- चार कैदी एकमेकांशी भिडले, गंभीर दुखापतीमुळे दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम शाळेच्या छतावर उलटा लटकून व्यायाम करत होता. एकाने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला मात्र, छतावरचा स्लॅब खाली कोसळला. स्लॅब कोसळल्याने तो थेट डोक्यावर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेक युजर्संनी कंमेट केले आहे.

जमिनीवर पडल्यानंतर त्याला रुग्णालयत दाखल केले. पंरतु डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेनंतर शिवमच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात शोक पसरला आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्याच्या सोशल मीडियावर दोन हजार पेक्षा जास्त फॅन फोलोवर्स आहेत.